सरवडेत उद्या बैलगाडी शर्यत, कुस्ती मैदानाचे आयोजन

सरवडेत उद्या बैलगाडी शर्यत, कुस्ती मैदानाचे आयोजन

सरवडेत उद्या बैलगाडी शर्यत,
कुस्ती मैदानाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता. १२ : येथील माजी आमदार किसनराव मोरे यांच्या मंगळवारी (ता. १४) होणाऱ्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्तीचे जंगी मैदान, बैलगाडी शर्यती, कीर्तन, पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे संचालक आर. के. मोरे यांनी दिली.
मंगळवारी सकाळी आठ वाजता बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दुपारी चार वाजता कुस्ती मैदान होणार आहे. आखाडा पूजन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती उपहिंदकेसरी काका पवार तालमीचा तुषार डोंबे विरोधी शिवरामदादा तालमीचा शुभम सिद्धनाळे यांच्यात होणार आहे. कुस्ती मैदान आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार संजय घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. रात्री नऊ वाजता भाऊसो पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच रणधीरसिंह मोरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com