बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून जल्लोष

बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून जल्लोष
Published on

बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून जल्लोष

निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेंवर गर्दी; शाळांकडून अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा मंगळवारी निकाल लागला. निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. शाळांकडून विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले.

कागलमध्ये १४ शाळांचा निकाल १०० टक्के

सेनापती कापशी : कागल तालुक्यातील १४ उच्च माध्यमिक शाळांचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य, व्होकेशनल शाखांचा समावेश आहे. तालुक्याचा एकूण निकाल ९३.४० टक्के आहे. उत्तीर्णतेत मुलींनी बाजी मारली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये आयटीआयसह तालुक्यातील ४८०७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील ४४९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ९१.३१ टक्के मुले आणि ९६.२३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
१०० टक्के निकालाच्या शाळा अशा ः ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, मुरगूड (वाणिज्य, विज्ञान), दूधसाखर विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज बिद्री (विज्ञान), महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बेलवळे बुद्रुक (विज्ञान), न्यू इंग्लिश स्कूल सदाशिवनगर, हमीदवाडा (विज्ञान, कला), श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, लिंगनूर कापशी (विज्ञान, कला), करनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, करनूर (वाणिज्य), लक्ष्मीबाई पाटील ज्युनिअर कॉलेज, सुळकूड (वाणिज्य), श्रद्धा मॉडर्न स्कूल, कागल (विज्ञान), बोटे ज्युनिअर कॉलेज, सेनापती कापशी (विज्ञान), इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल, बोरवडे, (विज्ञान), एम. आर. पाटील विद्यानिकेतन जुनियर कॉलेज, बाचणी (विज्ञान), श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व जुनिअर कॉलेज, कागल (विज्ञान), देवचंद कॉलेज अर्जुननगर (व्होकेशनल), दूध साखर विद्यानिकेतन बिद्री (व्होकेशनल).
इयत्ता बारावीला आयटीआय समकक्ष आहे. यावर्षी तीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) निकालही शंभर टक्के लागला. यामध्ये जनता शिक्षण मंडळ आयटीआय, मेजर आनंदराव घाटगे आयटीआय, वाय. डी. माने आयटीआय यांचा समावेश आहे.

भुदरगडचा निकाल ९६.२८ टक्के

गारगोटी : भुदरगड तालुक्याचा १२ वी परीक्षेचा निकाल ९६.२८ टक्के लागला. तालुक्यातील ज्युनिअर कॉलेजमधून १६९८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १६३५ उत्तीर्ण झाले. तालुक्यातील ज्युनिअर कॉलेजच्या निकालाची टक्केवारी अशी ः कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी (९५.५५), वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गारगोटी (८२.०५), मडिलगे हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, मडिलगे बुद्रुक (८०), छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (८८.५०), न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मिणचे खुर्द (८७.५०), परशराम बाळाजी पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुदाळ (९९.७८), श्री मौनी महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाटगाव (९४.७३), कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, कडगाव (९६.२२) गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटी (९२.७२), आनंदराव आबिटकर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (१००), विद्यावर्धिनी ज्युनिअर कॉलेज, पाल (१००).

राधानगरीचा निकाल ९८.२० टक्के

सोळांकूर : राधानगरी तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.२० टक्के लागला. तालुक्यातील १७ ज्युनिअर कॉलेजमधून १६७३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १६४३ उत्तीर्ण झाले. तालुक्यातील सात ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला.
१०० टक्के निकाल लागलेली महाविद्यालये अशी : विद्यालंकार ज्युनिअर कॉलेज, शेळेवाडी, एच. बी. पाटील ज्युनिअर कॉलेज, मजरे कासारवाडा, महादेवराव महाडिक ज्युनिअर कॉलेज, दुर्गमानवड, पी. एन. पाटील ज्युनिअर कॉलेज, शिरगाव, राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज, राधानगरी, बी. के. पाटील ज्युनिअर कॉलेज, कौलव, कला-वाणिज्य जेनेसिस ज्युनिअर कॉलेज, गैबी तिट्टा. कॉलेजनिहाय टक्केवारी : रघुनाथ ज्युनिअर कॉलेज, कसबा वाळवे ९६.४७ टक्के, राधानगरी ज्युनिअर कॉलेज ९१.२६, सह्याद्री ज्युनिअर कॉलेज, धामोड ९६.१२, शिवाजी ज्युनिअर कॉलेज, कसबा तारळे ९९.६१, कौलव ज्युनिअर कॉलेज ९२.५०, शिवाजीराव खोराटे ज्युनिअर कॉलेज, सरवडे ९९.४१, किसनराव मोरे ज्युनिअर कॉलेज सरवडे ९९.७५, शिरगाव ज्युनिअर कॉलेज ९३.३३, यशवंतराव पाटील ज्युनिअर कॉलेज सोळांकूर ९८.२३, म्हासुर्ली ज्युनिअर कॉलेज ७५, विज्ञान ज्युनिअर कॉलेज, कोनोली ९०.९०, विठ्ठलाई चॅरिटेबल ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज, कसबा तारळे ७५ टक्के.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com