सरवडे

सरवडे

Published on

04468
आशियाई कुस्तीतील यशस्वी
विश्वजीत मोरे याचा सत्कार
सरवडे, ता. ६ : येथील पैलवान विश्वजित रामचंद्र मोरे याने जॉर्डन येथे आयोजित वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत ५५ किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्यपदक मिळवून सरवडेचे नाव उज्ज्वल केले. यशस्वी कामगिरीबद्दल विश्वजीतचा गोकुळ दूध संघ व  बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. के. मोरे यांच्या हस्ते व सरपंच रणधीर मोरे यांच्या उपस्थितीत सत्कार झाला. याप्रसंगी आर. के. मोरे म्हणाले, ‘विश्वजीतने आशियाई कुस्ती स्पर्धेत यश मिळवून देशाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले. याचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही पाठीशी राहू.’ कार्यक्रमास अशोक रेपे, आनंदा शेटके, डी. एम. जरग, जगदीश वाईंगडे, विजय मोरे, श्रीकांत पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.