सरवडे
4827
ठिकपुर्ली : येथे कृषिदूतांचे स्वागत करताना प्रल्हाद पाटील, शिवाजी साठे व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
..............
कृषिदूतांकडून ठिकपुर्लीत
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सरवडे, ता. ११ : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी दाखल झाले आहेत. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. विद्यार्थी गावात वास्तव्य करून शेतकऱ्यांच्या अडचणी, जीवनमान, उद्योग, दुग्ध व्यवसाय व हवामानाविषयी माहिती ॲपद्वारे कशी संपादित करता येईल याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. याव्यतिरिक्त शेतीची कामे व शेती व व्यवसाय कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
कृषीदूत पृथ्वीराज लाड, जयेश काळे, विजयकुमार कांबळे, श्रेयश कोल्हापुरे, संकेत जाधव यांचे सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच शिवाजी साठे, ग्रामसेवक निवृत्ती पाटील यांनी स्वागत केले. कृषिदूतांना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. बुलबुले, केंद्र समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही. एन. नाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

