पंचकल्याणिकासोबत संस्कार, शिक्षण आणि आरोग्य यावर समाजाने भर द्यावा
सांगली, दि. १२: पुणे विभागातील जैन समाज पंथभेद न मानता एकत्र येत दक्षिण भारत जैन सभेला पाठबळ देत आहे. या ऐक्याच्या भावनेला वृद्धिंगत करून समाजाला निर्भयता प्रदान करण्यासाठी संवाद मेळाव्यांद्वारे सभासद संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. समाजातील विभाजनामुळे शेतीचे तुकडे होणे, शिक्षण परवडत नसणे, तसेच औषधोपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणे या गंभीर समस्यांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पंचकल्याणिक पूजेवर अमर्याद खर्च करण्याऐवजी जैन समाजाने दक्षिण भारत जैन सभेच्या संस्कार, शिक्षण, व आरोग्य योजनेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. पुणे व मुंबई येथे सुसज्ज कार्यालये, वसतिगृहे आणि भव्य रुग्णालयांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समाजासाठी उपक्रम व उद्दिष्टे
भालचंद्र पाटील म्हणाले की, गाव तेथे पाठशाळा या उपक्रमाद्वारे संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम सुरू आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना शासकीय सेवांसाठी प्रशिक्षण दिले जाते. दानशूर व्यक्तींनी उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब जैन विद्यार्थ्यांसाठी "दत्तक पालक योजना" राबवून आर्थिक मदत केली आहे.
उत्सवांवर मर्यादित खर्चाचे आवाहन
पंचकल्याणिक पूजेसाठी होणाऱ्या खर्चाचा काही भाग शिक्षण आणि आरोग्य योजनेसाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रगती आणि जिनविजय या सभेच्या मुखपत्रांसाठी वर्गणीदार वाढविण्याचा संकल्पही करण्यात आला.
सर्वांगीण विकासासाठी सूचना
मेळाव्यात विविध मान्यवरांनी समाजाच्या प्रश्नांवर सखोल विचारमंथन केले. प्रमुख मुद्द्यांमध्ये जैन समाजासाठी वसतिगृहे, तंटामुक्ती योजना, अल्पसंख्यांक मेडिकल महाविद्यालय, आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारणी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचा समारोप
कार्यक्रमाची सुरुवात शालिनी जैन यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने झाली. प्रमुख पाहुण्यांचे पंचारतीने स्वागत करण्यात आले. २७ जिनमंदिरांचे ट्रस्टी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत उपाध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले, तर आभार महामंत्री अजित पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. एन.डी. बिरनाळे व अमित जैन यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.