

5049
नरतवडे ः येथे झालेल्या मैदानात कुस्ती लावताना मान्यवर.
............
किरण पाटीलकडून
विराज सातारकर चितपट
नरतवडेत केदारलिंग यात्रेनिमित्त कुस्ती मैदान
सकाळ वृत्तसेवा
सरवडे, ता. १८ : नरतवडे (ता. राधानगरी) येथे श्री केदारलिंग यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तुल्यबळ व मानाच्या कुस्तीमध्ये किरण पाटील (इस्पुर्ली) याने पोकळ घिस्सा डावावर विराज सातारकर (पेरीड) याला चितपट केले.
अक्षय चौगले (अर्जुनवाडा) व कर्तार कांबळे यांच्यात बरोबरी झाली. सूरज गुरव (नरतवडे), ओंकार पाटील (सडोली), स्वप्नील शेंडे (तिटवे) यांनी बाजी मारली, तर मुलींमध्ये सिद्धी सावंत (नरतवडे) हिने बांगडी डावावर प्रगती पाटील (खेबवडे) हिला चितपट केले. पायल पाटील (बाचणी) हिने एकेरी पटावर वाहिली पाटील हिच्यावर मात केली. प्रमुख विजेत्या मल्लांना चषक, पारितोषिक, रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्राथमिक शाळेच्या पटांगणात मातीचे मैदानावर स्पर्धआ झाल्या. तहसीलदार अनिता देशमुख व प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले.
अन्य कुस्ती स्पर्धा निकाल असा ः बरोबरीतील कुस्त्या राजवर्धन जाधव-आयुष तिरंगे, ज्ञानेश्वर शिंदे-पार्थ पाटील, आदर्श सुतार-स्वराज पाखरे. निकाली कुस्तीतील विजेते ः अतुल मगदूम, पवन भांदिगरे, कुलदिप पाटील, प्रताप पाटील, तेजस लोहार, प्रथमेश पोवार, ऋषिकेश पाटील, आदित्य देसाई, आदित्य गिरीगोसावी, रोहन खाडे, तन्मय चौगले, प्रज्वल पाटील, अभिषेक नलवडे, ओंकार पुजारी, सत्यजित सकपाळ, पृथ्वी सावंत, सौरभ पाटील, श्रीपाद भोसले, तन्वीर जमादार, सयाजी भोसले, स्वराज पाटील, सुजय तापेकर, हर्षद जाधव, विराज पाटील, सोहम पाटील, रणवीर सावंत, साईराज ढोणे, प्रणव तळेकर, आदित्य मोरबाळे.
स्पर्धेसाठी कृष्णात चौगले यांनी निवेदन केले. यावेळी केदारलिंग कमिटीचे तानाजी गुरव, साताप्पा कांबळे, प्रथमेश गुरव, सदाशिव सावंत, शिवाजी कदम, सदाशिव एरुडकर, महादेव पाटील, बळिराम पाटील, दत्तात्रय शेटके, यशवंत गुरव, जयसिंग शिंदे, आनंदा सावंत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.