सरवडे महिला दिन
सावित्रीबाई फुले महिला सेवा संस्था तळाशी
सरवडे : ‘केवळ महिलादिनी एकत्र येऊन एका दिवसापुरता हा उत्सव साजरा न करता सातत्याने एकत्र येऊन सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्याची गरज आहे,’ मत ताराराणी महिला फेडरेशनचे अध्यक्ष विजयालक्ष्मी आबिटकर यांनी व्यक्त केले. तळाशी येथे सावित्रीबाई फुले महिला सेवा संस्थेतर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी वंदना जाधव, अरुण जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी रेखा जाधव, विजया देसाई, भारती जठार, मीनाक्षी जाधव, नंदा जाधव, आदी उपस्थित होते.
...
आदर्श महिला दूध संस्था सोन्याची शिरोली
कसबा तारळे ः सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथे आदर्श महिला सहकारी दूध संस्थेच्या महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भुदरगडच्या माजी सभापती अक्काताई नलवडे प्रमुख उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी चौगले होत्या. यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी विजयमाला पाटील यांनी महिलांचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याविषयी प्रबोधन केले. संस्थेच्या अध्यक्षा संगीता संजय पारकर, उपाध्यक्षा आनंदी चौगले, सुवर्णा पोवार, रेखा मुळे आदी उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

