पाईपद्वारे पुरवठा केल्यास पाणी बचत

पाईपद्वारे पुरवठा केल्यास पाणी बचत
Published on

51207
काळम्मावाडी प्रकल्प
....
बिग स्टोरी
एस.के. पाटील
........
पाईपद्वारे पुरवठा केल्यास पाणी बचत

आर्थिक तरतुदीअभावी ‘काळम्मावाडी’चे पोटकालवे दुर्लक्षित
.....
इंट्रो....
सोळांकूर : काळम्मावाडी (दूधगंगा) प्रकल्पांतर्गत पोटकालवे व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली; पण उदासीन लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्याने अद्याप पोट कालवे दुर्लक्षित राहिले आहेत. ओढ्याच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहत आहे. काही जमिनी अतिपाण्यामुळे क्षारपड व नापीक बनत आहेत. त्यामुळे शासनाने पोट कालव्यांऐवजी आता थेट पाईपद्वारे पाणीपुरवठा केला तर पाण्याचा योग्य वापर होईल, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.
................
काळम्मावाडी प्रकल्प जिल्ह्याच्या कृषी आणि औद्योगिक विकासाबरोबरच पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे. ४०० किलोमीटरचे कालवे आणि ७१ हजार हेक्टर पिकाऊ क्षेत्र या प्रकल्पाअंतर्गत येते; परंतु जिल्ह्याची भाग्यदायी अशी ओळख असलेल्या या प्रकल्पातील शेतकरी आजही अतिरिक्त पाण्यामुळे शेतजमिनीतून अपेक्षित उत्पादन घेऊ शकत नाही. वितरित पाईपद्वारे योग्य पाण्याचे नियोजन केल्यास दूधगंगा नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि पाण्याचा वापरही काटकसरीने होईल याकडे लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.
शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी १९८० पासून कालवा खोदाईला प्रारंभ झाला. धरणाच्या पाण्याचे कालव्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्याला ७३,३४० हेक्टर आणि कर्नाटक राज्यातील १९,८६० हेक्टर क्षेत्राला लाभ होत आहे. धरणापासून लिगांचीवाडीपर्यंत डाव्या बाजूने एकच कालवा आहे. तेथून दूधगंगा नदीवर १४० मीटरचा ऐनी जलसेतू बांधून उजवा कालवा सुरू केला. उजव्या मुख्य कालव्याची एकूण लांबी २०० कि.मी.तर, डाव्या कालव्याची लांबी २०० कि.मी. होते. ६ जानेवारी १९९४ ला धरणातून कालव्यात पाणी सोडायला सुरुवात झाली.
प्रकल्पातर्गंत डाव्या व उजव्या कालव्यांच्या पोटकालव्यांद्वारे शेतीला पाणीपुरवठ्यासाठी शासनाने आराखडा तयार केला. त्यानुसार जमिनीही संपादित केल्या. त्यावेळी पोटकालव्यांसाठी स्व. विजयसिंह मोरे यांनी निवेदने, आंदोलनांच्या माध्यमातून मागणी केली होती; परंतु तत्कालीन लोकप्रतिनिधींनी यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्याने अद्याप पोटकालवे दुर्लक्षित राहिले आहेत. परिणामी ओढ्यांच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहून जात आहे. काही जमिनी अतिपाण्यामुळे क्षारपड व नापीक बनत आहेत. शासनाने आता पोटकालव्यांऐवजी वितरित पाईपद्वारे पाणीपुरवठा केल्यास पाण्याचा योग्य वापर होईल.
......
कोट...
काळम्मावाडी प्रकल्पाच्या कालव्यांचे अस्तरीकरण आणि मजबुतीकरण होणे अपेक्षित आहे. पोटकालव्यांमार्फत शेतीला पाणी देण्याऐवजी कालव्यातून पीव्हीसी पाईपद्वारे पाणी देणे सोयीचे ठरेल. सध्या शेतकरी एकत्र येऊन सायफन पद्धतीने आपल्या शेतीला पाणी देतात. हे जरी नियमबाह्य असले तरी अशा योजना अधिकृत करून शासनाने त्यांच्याकडून कर आकारणी करावी. कालव्यावरील सर्व गेट नादुरुस्त असून, ते दुरुस्त करून वाया जाणारे पाणी थांबवावे. पोटकालव्यांऐवजी पीव्हीसी पाईपद्वारे पाणी वाटपाबद्दल मी शासनाला लेखी कळवले होते.
- नंदकिशोर सूर्यवंशी, संचालक, बिद्री साखर कारखाना
.........................
कोट...
शासनाने पोटकालव्यांद्वारे पाणी देण्याचा प्रस्ताव कालबाह्य केला आहे. यापुढे कालव्यांतून थेट पाईपनेच शेतकऱ्यांना पाणी दिले जाईल. याबाबत डाव्या व उजव्या कालव्याचे सर्वेक्षण पाटबंधारे विभागाने केले आहे.
- अशोक पवार, कार्यकारी अभियंता, दूधगंगा कालवे
.........................
दृष्टिक्षेपात काळम्मावाडी प्रकल्प
- खर्च ः ८०० कोटी रुपये
- पाणी साठवण क्षमता ः २८ टीएमसी
- कालवे अंतर ः ४०० किलोमीटर
- लाक्षक्षेत्र कोल्हापूर जिल्हा ः ७३,३४० हेक्टर
- कर्नाटकसाठी लाक्षक्षेत्र ः १९,८६० हेक्टर
.........................
तालुकानिहाय लाभक्षेत्र (हेक्टर)
- राधानगरी ः ८२९९
- भुदरगड ः ३२३९
- कागल ः २१,६४०
- हातकणंगले ः ९७५७
- शिरोळ ः १४,०४९
- करवीर १६,३५६
- कर्नाटक (बेळगाव) ः १९,८६०
.........................
उजव्या कालव्याची लांबी २०० कि.मी.
- मुदाळ तिट्ट्यापर्यंत ः २४ कि.मी.
- तेथून कूर (ता. भुदरगड) शाखा ः १७ कि.मी.
- बिद्री (ता. कागल) शाखा ः १०५ कि.मी.
- निढोरी शाखा ः ५८.५० कि.मी.
.........................
डाव्या कालव्याची लांबी २०० कि.मी.
- कागल तालुक्यापर्यंत ः ७६ कि.मी.
- तेथून कुरुंदवाडपर्यंत ः ४४ कि.मी.
- दत्तवाडपर्यंत ः ४२ कि.मी.
........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com