सरवडे

सरवडे
Published on

5118
सरवडे ः येथील पोलिस दूरक्षेत्रातील समस्यांप्रश्नी निवेदन देताना आरपीआयचे भीमराव कांबळे.
.................
सरवडे दूरक्षेत्रात कायमस्वरूपी
पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

सरवडे : येथे पोलिस दूरक्षेत्र असून, ते गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी कोणीही पोलिस कर्मचारी नसतात. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सरवडे पोलिस दूरक्षेत्राच्या कार्यालयाची इमारत चांगली आहे. मात्र, निवासस्थानामध्ये झाडेझुडपे वाढलेले आहेत. दरवाजे-खिडक्या मोडलेल्या आहेत. या ठिकाणी निवासस्थान व कार्यालय निर्लेखित करून नवीन निवासस्थाने व कार्यालय बांधण्यात यावे. सरवडे गाव आठ ते नऊ हजार लोकसंख्येचे असून, मोठी बाजारपेठ, बँका, पतसंस्था, दोन जुनिअर कॉलेज व निपाणी-फोंडा राज्यमार्ग असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या दूर क्षेत्रास अतिसंवेदनशील ४२ गावे जोडलेली आहेत. तसेच मुदाळतिट्टा हे तीन तालुक्यांचे प्रवेशद्वार असून, जवळच आदमापूर येथे बाळूमामा मंदिर आहे. दर अमावस्येला लाखो भाविक व हजारो वाहने येतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी नेमावेत. मागणीचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक प्रमोद जाधव यांना रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस सरवडेकर भीमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिले. यावेळी पांडुरंग कांबळे, शशिकांत कांबळे, प्रकाश कांबळे, सागर कांबळे, नाथाजी कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com