सरवडे

सरवडे
Published on

जिल्ह्यात
२ पासून
निवडश्रेणीचे प्रशिक्षण
सरवडे : राज्यात एकाच वेळी २ ते १२ जूनपर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण होत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच हे प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने होत आहे. जिल्ह्यातील एकूण सहा केंद्रांवर प्रशिक्षण होणार असून १३५१ शिक्षक प्रशिक्षण घेणार आहे, तर १२० शिक्षक सुलभक म्हणजेच प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणात ३०० गुणांची परीक्षा होणार आहे. किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यास पुन्हा नव्याने पुढील वर्षी दोन हजार रुपये शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणात प्रत्येक तासिकेनंतर दहा गुणांची ऑनलाईन चाचणी परीक्षा होणार आहे. यासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडे अँड्रॉइड फोन असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी शिक्षकांना राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2023, मूल्यमापन प्रक्रिया, शिक्षक मार्गदर्शिका पुस्तिका भाग १ ते ५ यासह नवीन शैक्षणिक धोरणः २०२० या सर्वांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीनी अध्यापन करत असलेल्या वर्गाचे किंवा विषयाची पाठ्यपुस्तके आणि पेन ड्राईव्ह सोबत असणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com