

05348
तुरंबेत थेट पाइपलाईनच्या
चेंबरमध्ये पडली म्हैस
सरवडे, ता. १६ : तुरंबे (ता. राधानगरी) येथे मल्लाप्पा धावरे या शेतकऱ्याची म्हैस काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या उघड्या असणाऱ्या चेंबर्समध्ये पडली. त्यामुळे तिला इजा झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून जाणाऱ्या युवकांनी तिला सुखरूप बाहेर काढली. व तिचा जीव वाचवला. या घटनेमुळे चेंबर एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो याची आज प्रचिती आली. संबधित अधिकाऱ्यांनी तातडीने चेंबरला बंदीस्त करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
आज सकाळी म्हैस धुण्यासाठी नेत असताना अचानकपणे चेंबरमध्ये पडली. चेंबर खोल असल्याने तिला बाहेर येता येत नव्हते. काही ग्रामस्थ ,तरुण मुले यांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी दोर आणून म्हशीला खाली उतरून बांधले. मोठ्या शिताफीने तिला बाहेर काढले. मात्र या गडबडीत म्हशीला खूप जखमा झाल्या. यावेळी अमर बैलकर, पांडुरंग भोईटे, रमेश देवर्डेकर, दत्ता भोईटे , भिकाजी कांबळे ,संभाजी आंगज यांनी मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.