सरवडेत मागण्यांसाठी निवेदन

सरवडेत मागण्यांसाठी निवेदन
Published on

05909

जुनी पेन्शनसह प्रलंबित मागण्यांसाठी
२१ पासून राज्यभरात बेमुदत संप

सरवडे, ता. ७ : सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत उतरले असून प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्यभरातील १८ लाख कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे.
विशेषतः १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त होऊन नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक, शिक्षकेतर व इतर आस्थापनातील कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी केंद्रस्थानी आहे. कोअर कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी संगीताताई शिंदे, सुदेश जाधव, दिलीप डोंगरे, आशुतोष पवार, अभिजीत धानोरकर, सचिन पगार, सुनील दानवे, रामराव होन आदींनी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा करत हा मुद्दा बेमुदत संपातील प्रमुख मागण्यांमध्ये समाविष्ट केला. याशिवाय १०:२०:३० वर्षांच्या सेवेनुसार आश्वासित प्रगती योजना लागू करणे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठवणे, १९८१ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्या पाल्यांना नियुक्ती देणे, तसेच १५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन आदेश रद्द करणे आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करणे या महत्त्वाच्या मागण्यांचाही यात समावेश आहे. कर्मचारी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संपाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com