

ओंकार शुगरची बिले वर्ग
सोळांकूर : फराळे (ता. राधानगरी) येथील ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवरतर्फे ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहेत. चालू हंगामामध्ये एफआरपीपेक्षा जास्त म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत पुरवठा झालेल्या उसास ३५५० प्रतिटन व १६ जानेवारीपासून हंगाम अखेरपर्यंत ३६०० रुपये प्रतिटन या दराप्रमाणे होणारी बिले जमा केल्याची माहिती अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली. सरव्यवस्थापक शत्रुघ्न पाटील म्हणाले, ‘‘आठ दिवसांमध्ये पुढील हंगामासाठीचे रोलर पूजन करण्याचे निश्चित केले असून पुढील हंगामाची तयारी सुरू आहे. तोडणी वाहतूक करार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून अॅडव्हान्सची पहिली उचल लवकर वाहतूकदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.’’ यावेळी वर्क्स मॅनेजर नानासाहेब जाधव, चीफ अकौंटंट शरद पाटील, अशोक वाडकर, प्रशांत कांबळे, रमेश टिपुगडे, संभाजी देसाई, लिपिक वसंत डवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.