साहित्य गौरव पुरस्कारासाठी आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य गौरव पुरस्कारासाठी आवाहन
साहित्य गौरव पुरस्कारासाठी आवाहन

साहित्य गौरव पुरस्कारासाठी आवाहन

sakal_logo
By

साहित्य गौरव पुरस्कारासाठी आवाहन
सरुड : थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयातर्फे राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार तसेच ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन, आत्मकथन, चरित्र, वैचारिक आदी साहित्य विभाग प्रकारातील प्रत्येकी एका सर्वोत्तम साहित्य कलाकृतीस राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. इच्छुकांनी स्वतःच्या प्रकाशित साहित्यकृतीच्या दोन प्रती अध्यक्ष, राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालय थेरगाव (ता. शाहूवाडी) या पत्त्यावर १५ जानेवारी २०२३ पर्यंत द्याव्यात. तसेच राजर्षी शाहू ग्रंथमित्र पुरस्कारासाठी इच्छुकांनी ग्रंथालय चळवळीत काम करत असल्याची वैयक्तिक माहिती व कार्यअहवाल द्यावा, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत रेडेकर यांनी दिली.