शिरोळमध्ये आरोग्य शिबीर

शिरोळमध्ये आरोग्य शिबीर

Published on

शिरोळमध्ये
आरोग्य शिबिर
शिरोळ ः शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजना व आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले.
येथील ग्रामीण रुग्णालयात जागृत पालक, सुदृढ बालक सप्ताहाचा प्रारंभ व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. याच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपनगराध्यक्ष श्रीमती जयश्री धर्माधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेबची शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे, महिला आघाडी प्रमुख सविता पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपक कामत, चंद्रकांत भाट, डॉ. चेतन राजोबा, डॉ. वैभव हुगे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.