
मोटरसायकल चोरणाऱ्या दोन संशयितना अटक
दोघा मोटारसायकल चोरट्यांना अटक
शिरोळ, ता.२४ : येथील संभाजीनगर परिसरात पाच दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरणाऱ्या दोन संशयितांना पकडण्यात शिरोळ पोलिसांना यश आले आहे. प्रशांत राजू माने (वय ३४) व अर्जुन गणेश जगताप (२७, दोघेही रा. बेघर वसाहत, संभाजीनगर, शिरोळ) अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत. सूरज बाबासाहेब सय्यद यांनी १९ फेब्रुवारी रोजी रात्री अकरानंतर अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याची फिर्याद शिरोळ पोलिसांत दिली होती. याबाबत पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिंगडे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हा शोधपथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप, राजाराम पाटील, ताहीर मुल्ला, संजय राठोड, गजानन कोष्टी यांनी या चोरीचा छडा लावला. संशयित प्रशांत माने व अर्जुन जगताप हे घालवाड फाटा परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता चोरीतील मोटारसायकल मिळून आली. या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.