

हरिनाम सप्ताहानिमित्त देवता पूजन
शिरोळ, ता. ११ ः येथील बाल शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त उभारलेल्या मंडपामध्ये देवता पूजन आणि विठ्ठल रुक्माई मूर्ती प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात केली.
श्री गुरु बाबासाहेब आजरेकर पारंपारिक वारकरी सांप्रदायाला शिरोळमधील आगमनाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य किसन महाराज तथा आप्पासाहेब माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे सुरु आहे. १८ एप्रिलपर्यंत काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सौ. व श्री अजय पाटील, चंद्रकांत माळी, सनीसिंग पाटील, विजय पाटील (कवठेकर), प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे, रामप्रसाद पाटील, शैलेश पवार यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते विधिवत देवता पूजन आणि श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती प्रतिष्ठापना केली. वेदमूर्ती अनिकेत जोशी महाराज यांनी मंत्रोपचाराने देवता पूजन आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा विधी केला. ज्ञानवशं प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेदांत केसरी गुरुवर्य किसन महाराज तथा आप्पासाहेब माने यांचे कीर्तन झाले.
भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्याध्यक्ष अनिलराव यादव, महासचिव सुभाषसिंग रजपूत, चंद्रकांत भाट, बाळासाहेब पाटील, सुभाष माने, बुधाजी चुडमुंगे, पिंटू रजपूत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.