स्वीकृत नगरसेवकपदी
दयानंद जाधव बिनविरोध

स्वीकृत नगरसेवकपदी दयानंद जाधव बिनविरोध

स्वीकृत नगरसेवकपदी
दयानंद जाधव बिनविरोध
शिरोळ ः शिरोळ नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राजर्षी शाहू विकास आघाडीचे दयानंद जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
स्वीकृत नगरसेवक रावसाहेब पाटील- मलिकवाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या उपस्थितीत विशेष सभा शुक्रवारी झाली. जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी घोषित केले.
नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, नूतन स्वीकृत नगरसेवक दयानंद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्षा करुणा कांबळे, राजेंद्र माने, डॉ. अरविंद माने, तातोबा पाटील, श्रीवर्धन माने देशमुख, कमलाबाई शिंदे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com