अर्जुनवाड सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसर्गी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

अर्जुनवाड सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसर्गी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर
Published on

अर्जुनवाड सरपंच,
उपसरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

शिरोळः अर्जुनवाड (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती कोळी, उपसरपंच रमेश बसर्गी यांच्या विरोधात दहाविरोधी तीन मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. सरपंच व उपसरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कामकाज करतात, असा आरोप करून ग्रामपंचायत सदस्यांकडून दाखल केलेल्या अविश्वास ठरावसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. अर्जुनवाडच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच, उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, संतोष पाटील, संतोष दुधाळे, परशराम बागडी, शोभा कोळी, शोभा डोंगरे, अर्चना थोरात, नंदाताई खोत, भारती परीट, संगीता चौगुले यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर अविश्वास ठरावाच्या विरोधात सरपंच स्वाती कोळी उपसरपंच रमेश बसर्गी, सदस्य विश्वनाथ कदम यांनी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com