करवाढ नसलेले शिरोळ पालिकेचे अंदाजपत्रक

करवाढ नसलेले शिरोळ पालिकेचे अंदाजपत्रक
Published on

करवाढ नसलेले शिरोळ पालिकेचे अंदाजपत्रक

सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. ३ ः कोणतीही करवाढ नसलेले येथील नगरपालिकेचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांनी सादर केले. महिला बालकल्याण, दिव्यांग कल्याण योजना, क्रीडा योजना, आर्थिक दुर्बल घटकांसाठी तरतूद केली आहे.
पालिकेच्या वार्षिक खर्चासाठी ४७ कोटी ९६ लाख १६ हजार १४५ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली. शहराच्या विकासासाठी ३९ कोटी १७ लाख ७६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. महसुली जमामध्ये कर, अभिहस्तांकित महसूल आणि भरपाई, महसुली अनुदाने, अंशदाने आणि अर्थसहाय, पालिका मालमत्तेपासून भाड्याचे उत्पन्न, फी वापर करता आकार आणि द्रव्य दंड यांच्यापासून मिळणारे उत्पन्न, विक्री व भाडे आकार यापासून उत्पन्न, व्याजापासूनचे मिळणारे उत्पन्न, समपदहद ठेवी व न परतावा ठेवी, इतर उत्तन्न ७ कोटी ३ लाख ५८ हजार ७३९ रुपये.
महसुली खर्च आस्थापना खर्च, सर्वसाधारण प्रशासकीय खर्च, व्याज व वित्त आकार, दुरुस्ती व परीक्षण, व्यवहाराकरिता कार्यक्रम, अंमलबजावणी करिता खरेदी, दिलेली महसुली अनुदाने, अंशदान आणि अर्थसहाय्य, तरतुदी आणि निलेखन करणे, राखीव निधी आणि संकीर्ण खर्च, असा ७ कोटी ३ लाख ५५ हजार ७५ रुपये.
विशिष्ट प्रयोजनासाठी सर्व अनुदाने अंशदान, सुरक्षित आणि असुरक्षित कर्जे, प्राप्त ठेवी, शासनाच्या वतीने वसुली, तरतुदी, इतर दायित्व असा ३५ कोटी १९ लाख ७४ हजार ६९२ रुपये. भांडवली खर्च स्थिर व जंगम मत्ता, प्रगतिपथावरील भांडवली काम, गुंतवणुका, हातात असलेला माल, किरकोळ श्रुणको, कर्जे अग्रिमे आणि ठेवी, रोख आणि बँक शिल्लक व इतर मत्ता असा ४० कोटी ९० लाख ६१ हजार रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com