शिरटीतील भैरेश्वर मंदिरात कलशारोहण, वास्तुशांती

शिरटीतील भैरेश्वर मंदिरात कलशारोहण, वास्तुशांती

शिरटीतील भैरेश्वर मंदिरात कलशारोहण, वास्तुशांती
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. २५ ः येथील जागृत ग्रामदैवत भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, होमहवन, वास्तुशांती महाप्रसादाचे वाटप, समाज प्रबोधनपर व्याख्यान असे कार्यक्रम उत्साहात झाले.
मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्री भैरेश्वर देवालयाचे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास बुधवारपासून प्रारंभ झाला. आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकार परमात्मराज महाराजांच्या सान्निध्यात मांगूरचे शाम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा होत आहे.
श्री भैरेश्वर देवालयाच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घातला. यानंतर कलश अभिषेक, गणपती पूजन, पुण्याहवचन, मातृका पूजन, मादी श्राद्ध, ब्रह्म पीठ स्थापना, रुद्र पीठ स्थापना, मुख्य देवता स्थापना, वास्तुपीठ स्थापना, अग्नी स्थापना, नवग्रह स्थापना, वास्तुशांती, होम हवन असे धार्मिक विधी, कलश सवालधारक मानकरी पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले.
यानिमित्त दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त सकाळ संध्याकाळ महाप्रसाद झाला. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. युवा कीर्तनकार सोपान कनेरकर (महाराज) यांचे संस्कार या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी खानगोंडा पाटील, जीवंधर चौगुले, रामचंद्र पारदोळे, बाळासो गवळी, शशिकांत उदगावे, राजकुमार वारनोळे, जावेद खतीब आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com