आता सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी वजन काटा

आता सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी वजन काटा

आता सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी वजन काटा
आंदोलन ‘अंकुश’च्या काट्यास मंगळवेढ्यातील शिष्टमंडळाची भेट
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. ६ ः साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काटामारी रोखण्यासाठी येथे आंदोलन अंकुशने उभारलेल्या शेतकरी वजन काट्याची पाहणी मंगळवेढा येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी वजन काटा उभा करण्याचा निर्धार मंगळवेढा येथून आलेल्या शेतकरी शिष्टमंडळाने केला.
येथील आंदोलन अंकुशने उभा केलेल्या शेतकरी वजन काट्याची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा त्रयस्थ काटा उभारण्यासाठी मंगळवेढ्यातील वीस शेतकरी आज येथे आले होते. त्यांनी आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजन काट्याची माहिती घेतली. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी त्यांना काट्याविषयी व या प्रयोगाच्या यशस्वितेबद्दल माहिती दिली. काटा उभारणीसाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, अशाच प्रकारचा प्रयोग येत्या हंगामात काटा उभा करून करणार असल्याचे या समितीचे प्रमुख संजय कट्टे यांनी जाहीर केले. आंदोलन अंकुशचे कृष्णा देशमुख, महेश जाधव, अमोल गावडे, एकनाथ माने, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, मंगळवेढ्यातील सजग नागरी कृती समितीचे ॲड. भारत पवार, शेतकरी संघटनेचे सिद्धेशवर हैम्बडे आदी शिष्टमंडळात सहभागी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com