संपर्कासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा

संपर्कासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा

संपर्कासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा
संचालक डि. के. गोर्डे ः शिरोळमध्ये प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. २ ः माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने परस्परांशी संपर्कासाठी विविध साधने बनवली आहेत. त्याचा वापर करून मानव प्रगतीही करीत आहे. संपर्काची विविध साधने उपलब्ध असूनही संकटात संपर्क साधनांद्वारे संपर्क साधने शक्य होत नाही म्हणून ग्रामसुरक्षा यंत्रणा ग्रामीण भागासाठी सुरू केली आहे. ग्रामस्थ आपापले मोबाईल क्रमांक गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेत नोंदवून यंत्रणा वापर केल्यास परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच त्याची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते, अशी माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डि. के. गोर्डे यांनी दिली.
येथील समर्थ मंगल कार्यालयात पोलिस प्रशासन व जिल्हा परिषदतर्फे ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रारंभ केला. प्रमुख पाहुणे म्हणून गोर्डे बोलत होते. पोलिस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा ही महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. यामुळे महिलांनीही गावामध्ये सतर्क राहून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा. आपले गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आपले गाव आपली जबाबदारी या पद्धतीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे, ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, ग्रामसुरक्षा यंत्रणाचे जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे आदी उपस्थित होते. शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com