कोल्हापूर-सांगलीच्या पूरप्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या केवळ घोषणाच

कोल्हापूर-सांगलीच्या पूरप्रश्नावर  मुख्यमंत्र्यांच्या केवळ घोषणाच
Published on

कोल्हापूर- सांगलीच्या पूरप्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल ः चुडमुंगे
शिरोळ ता.२४ ः महापुराच्या काळात चार लाख क्यूसेक्स पाणी वाहत असते. त्यापैकी केवळ ३ हजार क्यूसेक्स पाणी वळवले जाणार असल्याची योजना आहे, हे हास्यास्पद आहे. सरकारकडून केवळ राजकीय गाजर दाखवले जात आहे. महापुराचे अगदी नगण्य पाणी वळवून, आम्ही कोल्हापूर सांगलीचा महापूर रोखणार असे सांगून मुख्यमंत्री येथील पूरग्रस्तांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे.
चुडमुंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, महापुराचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या वडनेरे समितीच्या अहवालातील २१ शिफारशीपैकी ३ शिफारशी नाकारल्या होत्या. त्यामध्ये कृष्णा खोऱ्यातील पाणी इतरत्र वळवू नये अशी शिफारस वडनेरे यांनी केली होती. त्या शिफारशिच्या विरुद्ध सरकार कृष्णा नदीचे पाणी वळवत आहे. .महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणे योग्य असले तरी हे पाऊल पुरग्रस्त भागाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणारे ठरणार नाही. महापुरावर उपाययोजना राबवण्यासाठी जागतिक बँकेकडून ३२०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले असले तरी त्याचा मोठा हिस्सा मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी वापरला जात असून, कोल्हापूर व सांगलीसारख्या दरवर्षी पूरबाधित होणाऱ्या जिल्ह्यांना नगण्य निधी दिला जात आहे. २००५ ते २०२४ या कालावधीत आलेल्या पाच महापुरांच्या अभ्यासानुसार दरवर्षी ३०० ते ३५० टीएमसी पाणी पुरामुळे पसरते. सरकार फक्त ८० टीएमसी पाणी वळवण्याची योजना करत आहे. पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचार लक्षात घेता प्रत्यक्षात ५० टीएमसी पाणी वळवले गेले तरी आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे हा महापूर रोखला जाईल, असे म्हणणे म्हणजे जनतेची दिशाभूल करुन केवळ राजकीय गाजर दाखवले जात असून, प्रत्यक्ष कृती शून्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com