शिरोली पुलाची : बायोगॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये गॅस गळती

शिरोली पुलाची : बायोगॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये गॅस गळती

03217
शिरोली पुलाची : बायोगॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये गॅस गळती झाली.
...
बायोगॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये गॅस गळती
राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील घटना
शिरोली पुलाची, ता. २ : राष्ट्रीय महामार्गावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बायोगॅस घेवून जाणाऱ्या ट्रकमधील गॅस गळती झाल्याने नागरिकांत प्रचंड घबराट पसरली. गॅस हवेत पसरुन दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. तसेच गॅसच्या दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज काही काळ थांबविण्यात आले. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली.
बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथून बायोगॅसच्या टाक्या भरून ट्रक (क्र. एमएच १० सीआर २९०६) कागल येथील एका खासगी कंपनीत जात होता. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर ट्रक आल्यानंतर ट्रकमधील काही बायोगॅस टाक्यांचा व्हॉल निकामी झाल्याने मोठा आवाज होत गॅस हवेत मिसळू लागला. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली. हवेत गॅस मिसळून त्याचा स्फोट होईल, या भितीने परिसरातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेले रूग्ण व डॉक्टर यांनी रुग्णालयातून बाहेर पडत पटांगणात धाव घेतली. गॅस दुर्गंधीमुळे डॉक्टरांनी काही काळासाठी काम थांबवले.
घटनास्थळी गॅस गळती रोखण्यासाठी कंपनीचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला. यामुळे गॅस गळती रोखण्यात यश आले. यानंतर ट्रक कागलकडे मार्गस्थ झाला. गॅस गळती झालेला ट्रक महामार्गावरच असल्यामुळे महामार्गवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी वाहतूक पूर्ववत सुरु केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com