प्रवीण भोलाकडून गणेश जगताप गुणावर पराभूत

प्रवीण भोलाकडून गणेश जगताप गुणावर पराभूत

03393, 03392
शिरोली पुलाची : येथील कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लास बक्षीस देताना ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवर. दुसऱ्या छायाचित्रात प्रथम क्रमांकाच्या लढतीतील एक क्षण.
.....................
प्रवीण भोलाकडून गणेश जगताप गुणावर पराभूत

शिरोली पुलाचीमध्ये उरुसानिमित्त कुस्ती मैदान ः दुसऱ्या लढतीत समीर देसाई विजेता

सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १२ : येथील कुस्ती मैदानात सांगली तालमीचा मल्ल हरियाणा केसरी प्रवीण भोला याने आंतरराष्ट्रीय संकुल पुणेचा पैलवान गणेश जगताप याला गुणावर पराभूत करून प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकून एक किलो चांदीच्या गदेचे बक्षीस पटकावले.
येथील पीर अहमदसो व पीर बालेचाँदसो उरुस आणि काशिलिंग बिरदेव यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने स्पर्धा झाली. दसरा मैदान येथे आयोजित कुस्ती मैदानाचे उद्‍घाटन उपसरपंच अविनाश कोळी, माजी उपसरपंच कृष्णात करपे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, संपत संकपाळ, विठ्ठल पाटील यांच्या हस्ते झाले.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत बुचडे कुस्ती केंद्राच्या समीर देसाईने सेनादलाच्या संग्राम पाटीलला पोकळ घिस्सा डावावर चितपट केले आणि कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मैदानात ४० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. महिला गटात दोन लढती झाल्या. इतर विजेते असे ः प्रदीप ठाकूर, वैभव हुबाळे, रोहन रणदिवे, शुभम मगर, आदर्श पाटील, अभिजित पवार, सागर राणगे, तौफिक सनदी, अथर्व चव्हाण, विघ्नेश केसरकर, आर्यन रानगे.
पंच म्हणून राम सारंग, बाळासाहेब व्हनागडे, विठ्ठल पाटील, संदीप पाटील, बापूसो पुजारी, युवराज पुजारी, लखन घाटगे, गंगाराम पुजारी यांनी काम पाहिले. ईश्वरा पाटील यांनी निवेदक म्हणून भूमिका बजावली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महंमद महात, महादेव सुतार, श्रीकांत कांबळे, आरीफ सर्जेखान, संपत संकपाळ, बाजीराव पाटील, धनाजी पाटील, दीपक यादव, योगेश खवरे, राजहंस पाटील, शिवाजी समुद्रे, संदीप शिंदे, हिदायत्तुल्ला पटेल, सागर कौंदाडे, बटील देसाई, अभिजीत कोळी आदी उपस्थित होते.
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com