शिरोली : शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

शिरोली : शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Published on

शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ

शिरोली पुलाची, ता. ११ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर मुदत होती. यामध्ये दुसऱ्यांदा १५ डिसेंबर अंतिम मुदतवाढ वाढ दिली आहे.
९ फेब्रुवारीला परीक्षा ऑनलाइन होणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरचा कालावधी दिला होता. शाळांनी विनंती केल्याने नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची मुदत ७ डिसेंबरपर्यंत वाढविली होती. आता नियमित शुल्कसह १५ डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येतील. विलंब शुल्कसह २३ डिसेंबर आणि अतिविलंब शुल्कासाठी २४ ते २७ डिसेंबर मुदत आहे. याखेरीज अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबर मुदत आहे. शिष्यवृत्तीसह शासकीय विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन येथील प्रवेशांसाठीही या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील. ९ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२.३० वेळेत प्रथम भाषा आणि गणित विषयांची परीक्षा होईल. प्रथम भाषेचा पेपर हा ५० गुणांचा तर गणित विषयाचा पेपर १०० गुणांचा आहे. दुपारी २ ते ३.३० या वेळेत तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे पेपर होतील. तृतीय भाषेचा पेपर ५० गुणांचा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर १०० गुणांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com