शिरोली : समर्थ देशमुख यांची निवड

शिरोली : समर्थ देशमुख यांची निवड
Published on

3764
समर्थ देशमुख
.....
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी
समर्थ देशमुखची निवड
शिरोली पुलाची : कुमार-कुमारी (ज्युनिअर) गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात येथील समर्थ मुकुंद देशमुख याची निवड झाली. तो येथील छावा क्रीडा मंडळाचा खेळाडू आहे. त्याला मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील, प्रशिक्षक नामदेव गावडे यांचे मार्गदर्शन, तर वडील मुकुंद देशमुख व आई दीपाली देशमुख यांचे प्रोत्साहन लाभले. उत्तराखंड येथे भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने, उत्तराखंड कबड्डी असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले आहे. हरिद्वार येथील रोशनबाद बंदिस्त क्रीडा संकुल येथे स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी राज्य संघात कोल्हापुरातून निवड झालेला समर्थ हा एकमेव खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com