शिरोली पुलाची ः ग्रामीण विकासाचे प्रेरणादायी ‘मॉडेल’

शिरोली पुलाची ः ग्रामीण विकासाचे प्रेरणादायी ‘मॉडेल’
Published on

शिरोली पुलाची
ग्रामीण विकासाचे प्रेरणादायी ‘मॉडेल’
.....
एंट्रो...
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची गाव आधुनिकतेकडे झेपावत ग्रामीण विकासाचा आदर्श ठरत आहे. नियोजनबद्ध पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, शिक्षण व पर्यावरणपूरक उपक्रमांच्या जोरावर गावाने ‘शिरोली मॉडेल’ उभे केले असून लोकसहभाग आणि सक्षम नेतृत्वामुळे विकासाला वेग मिळाला आहे.
.....................
जिल्ह्याच्या सुपीक मातीत वसलेले शिरोली पुलाची गाव आज केवळ भौगोलिक ओळख उरलेली नाही, तर ते ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासकथेतील एक प्रेरणादायी पर्व ठरू लागले आहे. एकेकाळी साधेपणात नांदणारे हे गाव आज आधुनिकतेच्या स्पर्शाने उजळून निघाले आहे. रस्त्यांवरची प्रकाशमान दिव्यांची रांग, शिस्तबद्ध कचरा व्यवस्थापन, डिजिटल सेवा आणि शिक्षणाच्या नव्या वाटा या सगळ्यांच्या संगमातून शिरोली एक ‘विकसनशील नगर’ म्हणून आत्मविश्वासाने उभे राहात आहे. या परिवर्तनामागे ग्रामपंचायतीचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सरपंच पद्मजा करपे आणि उपसरपंच विजय जाधव यांनी ‘एक गाव, एक स्वप्न, एक दिशा’ हे ध्येय कृतीत उतरवले आहे.
या प्रवासाला बळ देणारा महत्त्वाचा आधार म्हणजे ‘महाडिक आघाडी’चे मार्गदर्शन. त्यांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करत शिरोलीने विकासाची गती पकडली आहे. मात्र, या सगळ्याचा आत्मा आहे तो लोकसहभाग, गावकऱ्यांनी विकासाला दिलेले मनापासूनचे पाठबळ.
‘शिरोली मॉडेल’ ही संकल्पना आता आकार घेत आहे. नियोजनबद्ध रचना, डिजिटल नकाशे, सक्षम पाणीपुरवठा, मजबूत रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था या सर्व गोष्टींमुळे गावाचे रूपांतर एका सुबक आणि सुसज्ज व्यवस्थेत होत आहे. प्रत्येक प्रभागात विकासाची ‘गंगा’ पोहोचावी, यासाठी मूलभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. केवळ विकासकामांची संख्या नव्हे, तर त्यांच्या गुणवत्तेवर दिला जाणारा भर हीच शिरोलीची खरी ओळख बनत आहे.
शिक्षण, संस्कृती आणि क्रीडा या क्षेत्रांनाही शिरोलीत तितकेच महत्त्व दिले जात आहे. अंगणवाड्यांचे स्मार्टकरण, शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन निधी या उपक्रमांमुळे गावातील मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचं बळ मिळत आहे. महिलांसाठी डिजिटल साक्षरता, व्यवसाय प्रशिक्षण आणि स्वयंसहायता गटांमुळे त्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत. गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडांगणे आणि वाचनालये यामुळे शिरोलीची सामाजिक समृद्धी अधिकच खुलत आहे.
पर्यावरण संवर्धनाचाही शिरोलीने मनापासून स्वीकार केला आहे. ‘हरित शिरोली’ या संकल्पनेतून वृक्षारोपण, सौरऊर्जा, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि प्लास्टिकमुक्त गावासाठी उपक्रम राबविले जात आहेत. औद्योगिक वाढीच्या पार्श्वभूमीवरही पर्यावरणाचा समतोल राखण्याचा शिरोलीचा प्रयत्न कौतुकास्पद ठरतो.
आरोग्य आणि महिला कल्याण हे गावाच्या विकासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. मोफत आरोग्य शिबिरे, माता-बाल संगोपन योजना आणि विविध जनजागृती कार्यक्रमांमुळे गावकऱ्यांचे आरोग्य सुदृढ होत आहे. ‘डिजिटल शिरोली’च्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि सुलभ झाला आहे. घरबसल्या सेवा मिळवण्याची सोय गावकऱ्यांना आधुनिकतेचा नवा अनुभव देत आहे.
‘सरपंच आपल्या दारी’ उपक्रमातून प्रशासन थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे. लोकांच्या समस्या समजून घेऊन तातडीने उपाययोजना करणे हीच खरी लोकशाहीची ताकद शिरोलीत दिसून येते. त्यामुळेच गावकऱ्यांच्या मनात विश्वासाची नवी पालवी फुटली आहे. आज शिरोली पुलाची ही केवळ एक ग्रामपंचायत राहिलेली नाही, तर ती ग्रामीण विकासाचा एक आदर्श ‘ब्रँड’ बनू लागली आहे. इथल्या प्रत्येक रस्त्यात शिस्त आहे, प्रत्येक घरात समाधान आहे आणि प्रत्येक मनात आत्मसन्मानाची भावना आहे.
........................
कोट
शिरोलीचा विकास हा केवळ योजना राबविण्यापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. गाव हा विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि नागरिक हेच त्याचे खरे शिल्पकार आहेत.
- पद्मजा करपे, सरपंच
........................
शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करून गावाच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचा आमचा निर्धार आहे. विकासाच्या प्रत्येक कामात पारदर्शकता आणि गती राखत शिरोलीला आदर्श गाव बनविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
- विजय जाधव, उपसरपंच
........................
शिरोली ग्रामपंचायत ही प्रशासन आणि लोकसहभाग यांचे उत्तम उदाहरण आहे. डिजिटल सेवा, स्वच्छता मोहिमा आणि नियोजनबद्ध विकास यामुळे गावाने एक आदर्श निर्माण केला आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्यामुळे शिरोलीचा विकास वेगाने होत आहे.
- गीता कोळी, ग्रामविकास अधिकारी
.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com