
सावली केअर सेंटर मध्ये दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम हात व पाय साठी मोजणी शिबीर संपन्न*
00518
सावली केअर सेंटरमध्ये
दिव्यांगांसाठी शिबिर
सानेगुरुजी वसाहत ता. १३ ः भारत विकास परिषद, पुणे आणि पिरवाडी (ता. करवीर) येथील सावली केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सावली केअर सेंटरच्या प्रांगणात आज दिव्यांग बंधूंसाठी मॉड्युलर पद्धतीचे कृत्रिम हात व पाय हे मोफत वाटपासाठीचे मोजणी शिबिर झाले. शिबिरासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, बेळगाव, कोकण, गोवा परिसरातून १३५ दिव्यांग बंधूनी उपस्थिती लावली. ७ तास चाललेल्या शिबिरामध्ये भारत विकास परिषदेच्या टेक्निशियन टीमने सर्व दिव्यांगांची आवश्यकतेप्रमाणे हात व पायांची मापे घेतली. दिव्यांग बंधूंना १६ एप्रिलला कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्सचे वाटप होणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना हात आणि पाय वापरण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष मंदार जोग, राहुल करमरकर, समर ठाकरे, विनय खटावकर, सुहास काणे, महेश कुंभोजकर, गजानन सुभेदार यांनी विशेष प्रयत्न केले. सावली केअर सेंटरचे विश्वस्त प्रकाश मेहता, महेश धर्माधिकारी, राजन देशपांडे, फिजिओथेरपिस्ट डॉ. राजकुमारी नायडू, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुराडे यांच्याबरोबरच डॉ. किशोर देशपांडे, ऋषिकेश डोंगळे, कुणाल सरावणे, योगेश चव्हाण, स्वप्नील ठोंबरे, सौरभ शेवाळेंसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.