( सुधारित बातमी )पुईखडीच्या च्या वळणावर उसाने भरलेला ट्रक उलटला सुदैवाने जीवितहानी नाही ट्रकचे मोठे नुकसान

( सुधारित बातमी )पुईखडीच्या च्या वळणावर उसाने भरलेला ट्रक उलटला  सुदैवाने जीवितहानी नाही ट्रकचे मोठे नुकसान
Published on

0835
पुईखडी : येथील वळणावर उसाने भरलेला ट्रक उलटला.
...

ऊस वाहतूक करणारा ट्रक
पुईखडीच्या वळणावर उलटला

साने गुरुजी वसाहत, ता.२८ः ऊस वाहतूक करणारा ट्रक पुईखडीच्या वळणावर उसाचा भार एका बाजूला पडल्याने उलटला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील पंडित गुरव यांच्या मालकीचा ऊस घेऊन हा ट्रक आसुर्ले पोर्ले येथील कारखान्याकडे निघाला होता. ट्रकमध्ये सुमारे दहा टन ऊस होता. पुईखडीच्या वळणावर ट्रक आला असता, वळण घेताना उसाचा भार एका बाजूला आल्याने लावलेले मोके मोडले व ट्रक एका बाजूला कलला. प्रसंगावधान राखून ट्रकचालक वसंत गणपती पाटील (वय ४५) यांनी उडी मारून जीव वाचवला. हा ट्रक कौलव (ता. राधानगरी) येथील कुंडलिक पांडुरंग चरापले यांच्या मालकीचा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी आरामबस उलटून तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांप्रकरणी या रस्त्याचे तज्ज्ञांमार्फत फेरसर्वेक्षण व्हावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com