शालेय पोषण आहारात पौष्टिकता वाढवणाऱ्या पाककृतीचा समावेश

शालेय पोषण आहारात पौष्टिकता वाढवणाऱ्या पाककृतीचा समावेश

Published on

पौष्टिकता वाढवणाऱ्या पाककृतीचा
शालेय पोषण आहारात समावेश
सकाळ वृत्तसेवा
साने गुरुजी वसाहत, ता. २७ : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याकरिता पौष्टिकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दोन नव्या पाककृती तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आहार शिजवून देणे, बचत गटांना बंधनकारक राहणार आहे.
सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी व्हेजिटेबल पुलाव, मसालेभात, मसुरी पुलाव, मटार पुलाव, सोयाबीन पुलाव, अंडा पुलाव यापैकी एक देण्यात येणार आहे. मंगळवार, गुरुवार, शनिवार भाताबरोबर कडधान्याची उसळ किंवा भाजी किंवा आमटी, मोड आलेल्या मटकीची उसळ किंवा मूगडाळ खिचडी किंवा मोड आलेले कडधान्य देण्यात येईल.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार लाभ देण्यासाठी स्थानिकस्तरावर उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करून आहाराचा दर्जा व गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. याविषयी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी केंद्रीय स्वयंपाक घर प्रणाली अंतर्गत सर्व कार्यरत बचत गटांना कळवले आहे. संबंधित गटांनी त्यानुसार अन्न शिजवून देण्याचे आहे, असे प्रशासन अधिकारी कांबळे यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com