(  सुधारित बातमी  )एन. एम. एम. एस सराव परीक्षा आज.  जिल्ह्यातील ७२ केंद्रावरून  २७६३७ विद्यार्थी देणार परीक्षा.

( सुधारित बातमी )एन. एम. एम. एस सराव परीक्षा आज. जिल्ह्यातील ७२ केंद्रावरून २७६३७ विद्यार्थी देणार परीक्षा.

Published on

एनएमएमएस
सराव परीक्षा आज
साने गुरुजी वसाहत ः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन. एम. एम. एस. परीक्षा. या परीक्षेची सराव परीक्षा शनिवारी (ता. १४) जिल्ह्यातील ७२ केंद्रांवरून २७६३७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेची ही सराव परीक्षा म्हणजे रंगीत तालीम आहे. ज्या केंद्रावरून सराव परीक्षा देणार आहेत त्याच केंद्रावर या परीक्षेची अंतिम परीक्षा २२ डिसेंबर रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची व केंद्राची भीती निघून जावी या उद्देशाने या सराव परीक्षा घेण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी दिली. इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी व ज्यांना सातवी मध्ये ५५ टक्के साधारण गटात तर ५०टक्के मागास गटात गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला प्रविष्ट होता येते. पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार प्रमाणे बारावीपर्यंत ४८ हजार रुपये मिळतात. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात. SAT ( शालेय क्षमता चाचणी) व MAT( मानसिक क्षमता चाचणी) असे दोन पेपर असणार आहेत. पहिला पेपर सकाळी साडेदहा ते बारा तर दुसरा पेपर दुपारी दीड ते तीन या वेळेत होणार आहे. याच दिवशी पेपर तपासून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूरचा शैक्षणिक दर्जा वाढावा या उद्देशाने गतीवर्षीपासून हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे. यावर्षी चौंडेश्वरी शिक्षण संस्था इचलकरंजी चे अध्यक्ष डी.एम. कस्तुरे यांनी सराव प्रश्नपत्रिका छापण्यासाठीचा येणारा खर्च दिला आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची प्रेरणा लाभली आहे. या परीक्षेसाठी उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, विस्ताराधिकारी जयश्री जाधव, डी. ए. पाटील अजय पाटील, विश्वास सुतार , रत्नप्रभा दाभाडे,डी. सी. कुंभार,उकिर्डेकर यांच्यासह माध्यमिक विभागातील सर्व टीम परिश्रम घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com