आदर्श प्रशालेत दहावी शुभेच्छा समारंभ संपन्न
आदर्श प्रशालेत
सदिच्छा समारंभ
साने गुरुजी वसाहत ः जुना वाशी नाकाजवळील सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा सदिच्छा समारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून विजयसिंह भोसले होते. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक आर. वाय. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आर. बी. माने यांनी करून दिला. संचिता मोरबाळे, जान्हवी पाटील, समर्थ अलुगडे आणि अभय बुरंगे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. एस. एस. शिंदे यांनी प्रशालेचा कार्य अहवाल सादर केला. प्रमुख अतिथी व वक्ते विजयसिंह भोसले यांनी चांगल्या सवयी अंगीकारणे, आत्तापासूनच JEE आणि NEET परीक्षांसाठी मेहनत घेणे, सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्व जाणून घेऊन त्यांचा आदर करणे, असे सांगितले. क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. डी. पी. सुतार यांनी सूत्रसंचालन केले. ए. के. देसाई यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

