प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता : महेश चोथे

प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता : महेश चोथे
Published on

02360
‘निपुण भारत अभियान
यशस्वीतेसाठी पुढाकार घ्यावा’

सानेगुरुजी वसाहत, ता. १० ः प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असून त्यासाठी निपुण भारत अभियान यशस्वी करण्यासाठी शाळा, शिक्षक व समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे मत शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी व्यक्त केले.
फुलेवाडीतील प्रबुद्ध भारत हायस्कूलमधील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणस्थळी भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे, ‘डायट’चे अधिव्याख्याते टी. एम. कुंभार, शैक्षणिक पर्यवेक्षक चंद्रकांत कुंभार, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, विक्रम भोसले उपस्थित होते.
श्री. चोथे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार प्राथमिक स्तरावर २०२६.२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातील प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे आवश्यक आहे. यासाठी नास, असर यासारख्या राष्ट्रीय, राज्य स्तरावर विविध सर्वेक्षण अहवालामध्ये राज्यातील शाळामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतची स्थिती दर्शनात आली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सर्व घटकांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.’ राजेंद्र कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com