

03360
खासगी प्राथमिक शाळांना
वेतनेतर अनुदान मिळावे
शिक्षक महासंघाची निवेदनाद्वारे मागणी
साने गुरुजी वसाहत ता. ७ ः राज्यातील मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांना वेतनेतर अनुदान त्वरित मिळावे, अशी मागणी शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.
मान्यताप्राप्त प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चार टक्के वेतनेतर व एक टक्के इमारत भाडे व देखभाल यासाठी पाच टक्के या प्रमाणे वेतनेत्तर अनुदान दिले जाते. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांचे गतवर्षीचे मार्च २०२५ व यावर्षीचे मार्च २०२६ चे वेतनेतर अनुदान राज्यातील शाळांना वितरित झालेले नाही. वेतनेतर अनुदान आदा करण्याबाबत २७ मार्चच्या आदेशानुसार २.६६ कोटींचे अनुदान वितरित करण्याचे आदेश आहेत. या शासनादेशात मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांचा उल्लेख आहे. परंतु प्रत्यक्ष अनुदान देत असताना माध्यमिक शाळांच्या लेखाशीर्षखाली वितरित केले आहे. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांचा उल्लेख असून शाळांच्या लेखाशीर्षासह अनुदान वितरित होणे आवश्यक होते. परंतु लेखाशीर्षाचा उल्लेख शासन आदेशात नसल्यामुळे मान्यताप्राप्त अनुदानित शाळांना गतवर्षी व यावर्षीचे वेतनेतर अनुदान प्राप्त झालेले नाही. तरी मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांना वेतनेतर अनुदान आदा करण्याचे आदेश मिळावेत,अशी मागणी निवेदनात केली. जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधीक्षक भारती पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी यावेळी शहर शिक्षकेतर प्रमुख विद्या बारामते, रंजना शिंदे, पिराजी बामणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
मान्यताप्राप्त खासगी शाळांच्या लेखाशीर्षाचा उल्लेख नसल्यामुळे शाळांना अनुदान मिळू शकले नाही. गतवर्षीचे व यावर्षीचे अनुदान शाळा मिळण्यासाठी आदेश निर्गमित करावेत.
-राजेंद्र कोरे, राज्य सचिव, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.