शिक्षकेत्तर कर्मचारी यांची समायोजन प्रक्रिया स्थगित करा : खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची मागणी

शिक्षकेत्तर कर्मचारी यांची समायोजन प्रक्रिया स्थगित करा : खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची मागणी
Published on

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समायोजन
प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

साने गुरुजी वसाहत, ता. ८ : राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्याच शाळेच्या माध्यमिक शाळेमधील रिक्त शिक्षकेतर पदावर समायोजन करण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली.
शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी १७ एप्रिल २० २६ खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन त्याच शाळेच्या माध्यमिक शाळेमधील रिक्त शिक्षकेतर पदावर करण्याबाबत निर्देशित केले आहे. आरटीई कायद्यात कोठेही खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे अतिरिक्त ठरवावीत, असे नमूद नसताना शिक्षकेतर पदे अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय खासगी प्राथमिक शाळांवर अन्याय करणारा आहे. ही पदे एकाकी पदे आहे. त्यामुळे समायोजन करणे चुकीचे ठरेल.
शिक्षण संचालकांच्या वरील आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने कर्मचाऱ्यांना त्याच शाळेमध्ये निवृत्त होईपर्यंत वेतन व सेवा देण्याच्या आदेश दिले आहेत. तेथे निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिक्षक भारती पाटील यांन स्वीकारले. यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, सल्लागार एम. डी. पाटील, विभागीय शिक्षकेतर प्रमुख राजू पांढरबळे, जिल्हाध्यक्ष सागर जाधव, शहराध्यक्ष अर्जून चाफोडीकर, जितेंद्र पाटील, सुचित्रा अग्निहोत्री , गीता चव्हाण, भारती पाटील, संजय चव्हाण, फिरोज नायकवडी, आनंदा पोवार, सुर्यकांत चौगुले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com