क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक परिसर च्या वतीने क्रांती दिन

क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक परिसर च्या वतीने क्रांती दिन
Published on

56308
कोल्हापूर : क्रांतीज्योत प्रज्वलित करताना विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. धनंजय पठाडे. शेजारी अध्यापक आणि विद्यार्थी.

विद्यापीठ हायस्कूलतर्फे
हुतात्म्यांना अभिवादन
कोल्हापूर : क्रांती दिनानिमित्त विद्यापीठ हायस्कूलच्या वतीने क्रांतीज्योत रॅलीचे आयोजन केले होते. विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित केली. विद्यापीठ हायस्कूलतर्फे बिंदू चौकातील स्मृती स्तंभाला माजी विद्यार्थी आणि स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या स्मृतीस अभिवादन केले. ॲड. पठाडे यांनी विद्यार्थ्यांनी देशाचा हा जाज्वल्य इतिहास आणि हुतात्म्यांचा त्याग कायम स्मरणात ठेवून देशसेवेसाठी प्रेरित व्हावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी मुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, एम. व्ही. कुंभार, एन. ए. ढेंगे आदी उपस्थित होते.
---
नाना पाटील नगरात क्रांती दिन
सानेगुरुजी वसाहत ः क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक परिसर येथे ज्येष्ठ नागरिक के.एच.झोरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. गजानन विभुते व चंद्रकांत बागडी यांनी मनोगते व्यक्त केलीत. यावेळी प्रकाश जोशी, सर्जेराव पाटील, प्राध्यापक दिनकर पाटील, सुरेश गुरव, नंदकुमार पिसे, प्रकाश भोपळे, निवृत्त पोलिस अधिकारी राजेश चव्हाण, रामचंद्र अडसुळे, संभाजी सुतार, रेखा पोवार आदी उपस्थित होते.
-
कॉमर्स कॉलेजमध्ये क्रांती दिन
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे ऑगस्ट क्रांती दिन साजरा झाला. प्रारंभी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, नाइट कॉलेजचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक प्रेरणा सुतार, ऋषिकेश परीट, आदेश कोठारी, राजश्री शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाधिकारी डॉ. अशोक बन्ने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com