सातवे येथे अवनी महिला प्रभाग संघाचा मेळावा व वर्धापन दिन संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातवे  येथे अवनी महिला प्रभाग संघाचा मेळावा व वर्धापन दिन संपन्न
सातवे येथे अवनी महिला प्रभाग संघाचा मेळावा व वर्धापन दिन संपन्न

सातवे येथे अवनी महिला प्रभाग संघाचा मेळावा व वर्धापन दिन संपन्न

sakal_logo
By

00944

सातवेत महिला मेळावा
सातवे ः येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व अवनी महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा व महिला मेळावा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच परिषदेच्या महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष राणी पाटील उपस्थित होत्या. यावेळी सरपंच अमर दाभाडे, ग्रा.पं. महिला सदस्या, सावर्डेचे सरपंच बाळासाहेब पाटील तसेच प्रभाग समन्वयक तेजस्विनी शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमास अध्यक्ष अश्विनी इंगवले, सचिव ज्योती चौगुले, कोषाध्यक्षा कल्पना चिले, युनियन बँक मॅनेजर वर्धीनी, रेश्मा काशीद, माधुरी कुंभार, वैशाली कांबळे, अश्विनी कोळी यांनी आयोजन केले. यावेळी कै. सावित्री चौगुले यांच्या स्मरणार्थ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान रोप देऊन केला. राणी पाटील यांनी स्त्रियांचे वर्तमान स्थान आणि कोणत्या बाबीवर स्त्रियांनी लक्ष केंद्रित करावे, समाजकारण, राजकारणात स्त्री सक्षम कशी होईल याविषयी मार्गदर्शन केले. राणी पाटील यांचा सत्कार सरपंच व महिला सदस्यांच्या हस्ते झाला.