सातवे परिसरात ऊस भरणीची लगबग

सातवे परिसरात ऊस भरणीची लगबग

सातवेत ऊस भरणीसाठी लगबग
सातवे : पन्हाळा तालुक्यातील पूर्वभागातील सातवेसह आरळे, सावर्डे, शिंदेवाडी, आमतेवाडी आदी गावांत ऊसाची भरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. वारणा नदीला बारमाही मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या परिसरातील शेतकरी प्रामुख्याने ऊसाचे पीक घेतात. साधारणपणे ऊसाचे पीक तीन महिन्यांचे झाल्यावर मातीची भरणी केली जाते. वारणेच्या पट्ट्यात ८६०३२ तसेच १०००१ हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. सध्या बैलजोडी दुर्मिळ झाल्याने बहुातांशी शेतकरी पाॅवर ट्रॅक्टर साह्याने भरणी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com