

51283; 51280
चाऱ्याचा दर भडकला
पन्हाळा तालुका; ज्वारीचा कडबा ४००० रुपये शेकडा
दिनकर पाटील ः सकाळ वृत्तसेवा
सातवे, ता. १४ ः पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. परिणामी हिरव्या चाऱ्याच्या टंचाईची तीव्रता वाढली आहे. कारखाने सुरू होते तोपर्यंत विकतच्या वाड्यावर दिवस काढले; पण आता तेदेखील परवडण्यापलीकडे गेले आहेत. गेल्या महिन्यात ज्वारीचा कडबा तीन हजार रुपये शेकडा मिळायचा. हाच दर आता ४००० रुपयांवर गेला आहे. नदीकाठच्या गवताचा एक हजार पेंडीचा दर सहा हजार झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर जनावरांच्या चाऱ्याचा टंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
पन्हाळा तालुक्यातील पूर्व परिसरात दिवसाला सात ते आठ गाड्यांतून वाड्याची विक्री होत होती. ते खरेदीसाठी परिसरातील शेतकऱ्यांची झुंबड असे. या चाऱ्यासाठी जादा किंमत मोजावी लागत होती. पन्हाळा तालुक्यातील सुक्या वैरणीची मागणी वाढली आहे. बऱ्याच भागात आडसाली उसाचा पाला वैरण म्हणून वापरला जातो. पण यंदा लागण ही कमी झाल्याचे चिन्ह आहेत. सध्या हत्ती गवताचा चारा म्हणून वापर वाढला आहे. डोंगर-कपारीतील करड्या गवताच्या सुक्या १००० पेंडीचा दर ५००० पर्यंत गेला आहे; तर भात पिंजराच्या मोळीचा दर ६ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या चाऱ्याचे वाढलेले दर पाहिले तर हा खर्च वाया गेला की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे
चौकट
अळीमुळे मका धोक्यात
नुकतेच कारखाने बंद झाल्यामुळे ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरात वैरणीसाठी मका पीक घेतले जाते; पण यंदा मक्याला अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मका पीक धोक्यात आले आहे. कडक उन्हाळ्याचे तीन महिने आहेत. ते कसे काढायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
वैरणीचे दर -
ओली वैरण-२००० रुपये गुंठा
शाळू कडबा-३००० रुपये शेकडा
मका सरी-२००० रुपये गुंठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.