

सातवे परिसरात
विजेच्या लपंडाव
सातवे : पावसाने ओढ दिल्याने पिकांना पाण्याची गरज असताना सातवे परिसरातील शेतकऱ्यांना महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतीपंप सुरू ठेवणे अवघड झाले आहे. दिवसाला चार तासही सुरळीत वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परिसरातील नदीपात्रात पाणी उपलब्ध असले, तरी वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. हाताशी आलेल्या ऊस पिकासह जनावरांसाठी लागणारा चारा वाचविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
शेतीसाठी निर्धारित वेळेनुसार वीजपुरवठा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात वारंवार ट्रिपिंग आणि तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. केवळ १० ते २० गुंठे क्षेत्राला पाणी देण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार वीज ये-जा होत असल्याने कृषीपंपांच्या मोटारी जळण्याचे प्रकारही वाढले आहेत.
याबाबत महावितरणचे शाखा अभियंता पोवार म्हणाले, ‘सातवे वीज उपकेंद्रात वीज उपलब्ध आहे. मात्र, फिडर व ट्रान्सफॉर्मरवरील तांत्रिक बिघाड, वीजवाहिन्यांवरील दोष तसेच फ्युज जाण्याचे प्रमाण वाढल्याने पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी भरून काढण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क सुरू असून, लवकरच निर्णय होईल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.