रेठरे - कोकरुड रस्ता मृत्यूचा सापळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेठरे - कोकरुड रस्ता मृत्यूचा सापळा
रेठरे - कोकरुड रस्ता मृत्यूचा सापळा

रेठरे - कोकरुड रस्ता मृत्यूचा सापळा

sakal_logo
By

कोकरूड-रेठरे मार्ग धोकादायक
तुरुकवाडी : कोकरुड कॉलनी हायवे ते रेठरे दरम्यानचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून संबंधित विभागाने गांभीर्य ओळखून रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी प्रवासी व वाहनचालक वर्गातून होत आहे. कोकरुड - रेठरे मार्ग कोल्हापूर, सांगली जिल्हा हद्दीतून जातो. शाहूवाडी, शिराळा तालुक्याच्या दृष्टीने प्रमुख मार्ग आहे. शाहूवाडी उत्तर भागातील जनतेला कोल्हापूर, कराड, सांगली आदी शहरांशी संपर्क ठेवण्याच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा आहे. दोन किमी रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावरुन वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. रस्त्याबाबत संबंधित विभागाने गांभीर्याने पावले उचलावीत; अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा रेठरे सरपंच सौ. वंदना ठोंबरे दिला आहे.