
कानसानदीचे पाणी दुषित , जलचरांना धोका
01598
‘कानसा’चे दूषित पाणी वारणा पात्रात
तुरुकवाडी, ता. ६ : कानसा नदीचे दूषित पाणी वारणानदी पात्रात प्रवाहित होत असल्याने मालेवाडी, गोंडोली परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कांडवण येथे कानसानदीवर एक टीएमसी धरण आहे . कानसा खोरा परिसरातील शेती व पिण्यासाठी धरण प्रशासनाकडून पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने पाणी सोडले जाते. विरळे, जांबूर, थावडे, मालेवाडी, सोंडोली गावच्या हद्दीत नदीपात्रात गवत, वेली, झाडाझुडपांचा पाला यांनी वेढा दिला आहे. पाणी विसर्ग बंद केल्यानंतर नदीपात्रातील गवत, वेली, पाला कुजतो. पाणी प्रवाहित नसल्याने पाणी दूषित होऊन पाण्याची दुर्गंधी व पाण्यावर तेलकट थर साचतो. धरणातून पुन्हा पाणी सोडल्यानंतर दूषित पाणी मालेवाडी येथे वारणानदी पात्रात येते. शिवाय दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचर नष्ट झाले आहेत. संबंधित विभागाने कानसानदी कायमपणे प्रवाहित ठेवण्याची मागणी होत आहे.
कोट
कांडवण धरण प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कानसा नदीचे पाणी दूषित होत आहे.
- संजय पाटील, शेतकरी सोंडोली