

कडवी नदीवरील मार्गाची चाळण
तुरुकवाडी : बिळाशी ते भेडसगाव व सरुड येथील कडवी नदीवरील रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी; अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील भेडसगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली. सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोकरुड ते बांबवडे प्रतिमा क्र - ७४ हा रस्ता ठिक ठिकाणी वाहतूक अयोग्य आहे. शिवाय सरुडजवळ कडवी नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुलावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. पुलाच्या सळ्या उघड्यावर पडल्या आहेत. मोठा अनर्थ होण्यापूर्वी पुलाचीही डागडुजी करणे आवश्यक आहे. बिळाशी - सरुड हा मार्ग शाहूवाडी -शिराळा तालुक्यांना जोडणारा जवळचा मार्ग असून हा रस्ता तर तीन मिनिटांचा असताना मार्गावरुन जाताना अर्धा तासाची कसरत करावी लागत आहे. तरी दोन्ही रस्त्याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.