हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्डमधील  विद्यार्थ्यांना चव्हाण परिवारातर्फे पुरण पोळीचे जेवण

हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्डमधील विद्यार्थ्यांना चव्हाण परिवारातर्फे पुरण पोळीचे जेवण

00288
‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड’मध्ये
अक्षय तृतीयेनिमित्त पुरणपोळी

उचगाव, ता. १० ः अक्षय तृतीयेनिमित्त चव्हाण - महाडिक परिवारातर्फे हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड संस्थेमध्ये असणाऱ्या सर्व दिव्यांग मुला-मुलींना अक्षय तृतीयेनिमित्ताने खास भोजनाचे आयोजन केले होते पुरणपोळी, कटाची आमटी, बटाटे भाजी यांचा समावेश होता.
माजी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी चव्हाण यांनी सामाजिक उपक्रम म्हणून अक्षय तृतीयेला हा उपक्रम राबववित असल्याचे सांगितले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा सण दिव्यांग मुलासोबत साजरा करताना वेगळीच अनुभूती आल्याचे सांगितले. यावेळी उचगाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिनकर पोवार, संजय चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विनी पाटील, विश्वनाथ कल्लोळी, यशराज माने यांनी स्वागत केले. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच सारिका माने, गुरुदेव माने, ग्रामपंचायत सदस्य वैजयंती यादव, अरविंद शिंदे, नीता हावळ, शिवानी पाटील, शीला मोरे, संदीप पाटील, राहुल मोळे, विनायक वीरागकरी, अर्चना महाडिक, वैष्णवी मन्नाडे, श्रीकांत दळवी, मधुकर चव्हाण, बाजीराव मनाडे, नारायण मन्नाडे, रवी महाडिक, प्रकाश महाडिक उपस्थित होते. श्रीधर कदम यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com