शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उचगाव येथे पेन्शनचे वाटप

शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उचगाव येथे पेन्शनचे वाटप

उंचगाव येथे
पेन्शनचे वाटप
उंचगाव ः येथे करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकाराने ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत ७ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली.
संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन दिली जाते. पेन्शनधारक हे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असल्याने व सध्या असलेल्या कडक उन्हामुळे त्यांना मार्केट यार्ड येथे जाणे गैरसोयीचे व त्रासाचे होते. त्यामुळे ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगावातील पेन्शनधारकांना आज उंचगाव येथील मंगेश्वर मंदिरात कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली. करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने आज ३०० लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप झाले. यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, अजित चव्हाण, आबा जाधव तसेच बँकेचे कर्मचारी सुनील केसरकर, मिलींद प्रभावळकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com