उचगाव उड्डाणपूल परिसरातील नाले सफाई पूर्ण  परिसर चकाचक  वाहनधारकांच्या समाधान सकाळ बातमीचा परिणाम सकाळ इम्पॅक्ट

उचगाव उड्डाणपूल परिसरातील नाले सफाई पूर्ण परिसर चकाचक वाहनधारकांच्या समाधान सकाळ बातमीचा परिणाम सकाळ इम्पॅक्ट

उचगाव उड्डाणपूल
परिसरात नालेसफाई
उचगाव ः उचगाव उड्डाणपुलाखाली हायवे चौक परिसरातील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई न केल्याने पाण वनस्पती व गाळाने गटारी भरलेल्या आहेत. पाऊस झाल्यास किंवा एखादा मोठा वळीव पडल्यास त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो होऊन पाणी हायवे चौकात साठून असते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करतच पाण्यातून वाहने पुढे घ्यावी लागतात. याचा ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना त्रास होत आहे. त्यामुळे हायवे चौक परिसरातील गटारीची नालेसफाई करणे गरजेचे आहे. यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली होती. याचा परिणाम म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परिसरातील नाल्यांची साफसफाई केली. नाल्यातील पाणवनस्पतींचा निचरा केला. दोन दिवसांपासून जेसीबी व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नालेसफाई चे काम सुरू होते. त्यामुळे पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास पाणी रस्त्यावर येणार नाही, त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी व दुर्गंधीचा प्रश्न सुटेल, अशी आशा आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com