उंचगाव येथे भगवा सप्ताह निमित्त सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद.

उंचगाव येथे भगवा सप्ताह निमित्त सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद.

Published on

00448

राज्याबाहेर गेलेले उद्योग
आणण्यासाठी उद्धवजींना बळ द्या

उपनेते संजय पवार; उंचगावला भगवा सप्ताह

उचगाव, ता. ७ ः ‘‘राज्याबाहेर गेलेले उद्योग आणण्यासाठी उद्धवजींना बळ द्या. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचे रान करूया,’’ असे आवाहन शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी येथे भगवा सप्ताह कार्यक्रमात केले.
भगवा सप्ताहानिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदरसंघातील शिवसेना पक्षाच्या सभासद नोंदणीचा प्रारंभ येथे झाला. यावेळी अध्यक्षस्थानी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव होते. यावेळी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून पक्ष संघटना बळकट करावी, असे आवाहन राजू यादव यांनी केले.
यावेळी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, दक्षिण संपर्कप्रमुख मंगेश साळवी, करवीर तालुकाप्रमूख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे, समन्वयक विक्रम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, तालुकाप्रमुख विनोद खोत, दीपक रेडेकर, राजेंद्र पाटील, सुनील चौगुले, संतोष चौगुले, दत्ता पाटील, कैलास जाधव, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, शफिक देवळे, अक्षय परीट, सचिन नागटिळक, सूरज पाटील, अजित चव्हाण, अजित पाटील, इमाम पठाण, उल्फत मुल्ला, मोहन आवळे, अमर जाधव, अजय प्रभावळे, प्रमोद शिंदे, बाबूराव पाटील, नितीन निकम आदींसह उंचगाव फाटा फेरीवाले संघटना, शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com