

तनिष्का लोगो घ्या.
00516
सरनोबतवाडी तनिष्का गटातर्फे
गरबा व दांडिया प्रशिक्षण
महिलांना शिकविले दांडियाचे विविध प्रकार
सकाळ वृत्तसेवा
उचगाव, ता. ३० : ग्रामीण भागातील महिलांनाही गरबा आणि दांडियाचा आनंद लुटता यावा म्हणून सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील दै. सकाळ तनिष्का व्यासपीठामार्फत २८ व २९ सप्टेंबरला प्रसिद्ध कोरिओग्राफर मोनिका भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दोन दिवस मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये दोन ताली गरबा, तीन ताली गरबा, चार ताली गरबा, रास गरबा, दोधीऊ गरबा, गौफ गरबा, गोप गुंठण सोलन्गा रास व रास दांडिया हे सर्व प्रकार अगदी कमी वेळेत शिकवले. दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ सरनोबतवाडी येथील तनिष्कांसह अन्य महिलांनी मनमुरादपणे घेतला. सरनोबतवाडीतील तनिष्का गटप्रमुख दीपिका खापणे यांच्या तनिष्का ग्रुपतर्फे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
कोट
अगदी कमी वेळेत झालेल्या प्रशिक्षणामध्ये महिलांचा प्रतिसाद व उत्साह चांगला होता. तनिष्का व्यासपीठामुळे मला संधी दिल्याबद्दल तनिष्का व्यासपीठाचे आभारी आहे.
- मोनिका पाटील-भोसले, दांडिया प्रशिक्षक
यावर्षी प्रथमच घेतलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे महिलांना गरबा व दांडियाच्या नवनवीन स्टेप्स शिकायला मिळाल्या.
- अर्चना शिंगे, तनिष्का सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.